सारस्वत अर्बन मल्टिसिटी निधी  लि . यवतमाळ

ग्रामीण व शहरी भागातील सर्वसामान्यांना मुख्य आर्थिक प्रवाहात आणण्याच्या उद्धेशाने २०१८  साली तरुण विचाराच्या तरुणांनी सुरु केलेल्यासारस्वत अर्बन मल्टिसिटी निधी  लि, बघता -बघता दहा हजाराहून अधिक सदस्यांचा महापरिवार झाला आहे . येण्याऱ्या प्रत्येकाला जिव्हाळ्याने,आपुलकीने जपणं आणि उत्तम सेवा देणे हे आद्य कर्तव्य समजून प्रामाणिक प्रयत्न करत वेगाने विस्तlर करणारी  सारस्वत  अर्बन मल्टिसिटी निधी  लि. महाराष्ट्र  राज्यात आहेत. ISO 9001:2008 मानांकन मिळवून ग्राहकांना मोबाईल बँकिंग, इंटरनेट बँकिंग, आधार बँकिंग, SMS बँकिंग, मायक्रो ATM, कोअर बँकिंग इ. सुविधा उपलब्ध करून दिल्या जात आहे. आधुनिक तंत्रज्ञान म्हणजे निरंतर प्रगतीचे साधन समजून काळानुरूप कार्यपद्धतीत बदल करत संस्थेने  नेहमीच ग्राहक सेवेचे नव-नवीन मानदंड प्रस्थापित केले आहेत. भारतात कोठेही पैसे पाठवायची आणि स्वीकारण्याची सुविधा उपलब्ध आहे. ग्राहकांची गरज लक्षात घेऊन ठेवी व कर्जाकरिता विविध पर्याय उपलब्ध करून देत संस्था अल्प कालावधीतच ग्राहकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे.
आजचा तरुण हा त्याच्या कुटुंबाचा व देशाचा आधारस्तंभ आहे, त्याच्यामधील उर्जेला योग्य दिशा मिळावी, त्याच्या व्यवसायाच्या इच्छेला प्रत्यक्षात उतरवण्याच्या दृष्टीने हजारो युवकांना कर्जपुरवठा व मार्गदर्शन करत आहे. त्यांच्या आयुष्याची सुरुवात करून देत त्यांना त्यांच्या पायावर उभे राहण्यास मदत केल्याचा संस्थेला नेहमी अभिमान आहे. बँकिंग  क्षेत्राचे नियम काटेकोरपणे पालन करत संस्था तारण व्यावसायिक कर्ज, सोने तारण व खरेदी कर्ज,  मॉर्गेज कर्ज इ. प्रकारचे कर्ज पुरवठा करत आहे. संस्थेकरता ठेवीदार व कर्जदार समान समजून, कर्जदारास त्याच्या व्यवसायात स्थेर्य मिळावे यासाठी वेळोवेळी तज्ञांकडून मार्गदर्शनही केले जाते. त्यामुळे त्याचे कर्जफेडीचे प्रमाण खूपच समाधानकारक आहे आणि यामुळे अनेक नव-व्यावसायिकांचे मनोबल वाढून त्यांना लागणाऱ्या आधाराची गरजही भरून निघते. अशा अनेक नाविन्यपूर्ण विचारांनी संस्थेला इतरांपेक्षा वेगळी प्रतिमा मिळते व प्रगतीला चालना मिळते.