आम्हाला अभिमान आहे सारस्वत परिवारातील प्रत्येक सदस्याचा आणि प्रत्येक सदस्याला जिव्हाळ्याने व उत्तम सेवा देऊन जपणाऱ्या आमच्या कर्मचाऱ्यांचा. संस्थेच्या स्थापनेपासूनचा प्रवास आम्हा सर्वांकरिता संघर्षाचा आहे, दरवेळी सकारात्मक मार्ग काढत आमची वाटचाल सुरु आहे. पाठीशी असलेल्या परिवारातील दहा हजाराहून
अधिक सदस्य आम्हाला बँकिंग क्षेत्रातील अत्याधुनिक सेवा-सुविधा देण्याची प्रेरणा देतात.  ” नातं आपुलकीचं  वचन  विश्वासाचं ”  हे  ब्रीद डोळ्यासमोर ठेऊन आम्ही नेहमी ग्राहकसेवेचे व ग्राहकांसाठी मोठ-मोठी स्वप्न बघितली व ती पूर्ण करण्यासाठी सर्वांनी आम्हाला साथही दिली. येणाऱ्या डिजिटल भारतासाठी आमचा प्रत्येक सदस्य तयार असावा या उदात्त हेतूने आम्ही पूर्वीच मोबाईल बँकिंग, इंटरनेट बँकिंग, फोन बँकिंग, आधार बँकिंग, SMS बँकिंग इ. सेवा ग्राहकांसाठी सुरु केल्या व सर्वांनी त्याचे स्वागत करत या सुविधा वापरायला आनंदाने सुरुवात ही केली. कॅशलेस भारत या पंतप्रधान श्री.नरेंद्र मोदींच्या मोहिमेला जनसामान्यांपर्यंत पोहचविण्यासाठी संस्थे मार्फत काही विशेष कार्यक्रम राबविले जातात . संस्थेच्या प्रवासाबद्दल सांगायचे झाले तर हा प्रवास आमच्यासाठी कसोटीचाच होता व नेहमी राहणार. सारस्वत परिवारातील हजारो सदस्यांचा विश्वास, त्यांच्या ठेवींची जबाबदारी, ठेवींवर चांगला परतावा व सुरक्षितता, उत्तम सेवा इ. मध्ये आम्ही व आमचे कर्मचारी कुठे कमी पडू नये याची काळजी घेत प्रगतीच्या वाटेवरचा प्रवास सुरु आहे. आम्ही मानतो कि “आपल्याकडे ठेवी किती यापेक्षा आपल्यावर ग्राहकांचा विश्वास किती” हे महत्वाचे आहे.

येणाऱ्या वर्षात आम्ही ग्राहकसेवेस अनेक आधुनिक सेवा-सुविधा घेऊन येतोय, तुमची साथ असेलच अशी अपेक्षा आहे. तुम्ही देत असलेल्या सहकार्याबद्दल संस्थेच्या वतीने आपले मनःपूर्वक आभार मानतो.

आपल्या सेवेसाठी.. आपली माणसं..

सौरभ गजानन डुचाळे                                                  संतोष रामभाऊ लोणारे
अध्यक्ष , व्यवस्थापकीय संचालक (C.E.O)                   उप सरव्यवस्थापक

सौरभ गजानन डुचाळे
अध्यक्ष , व्यवस्थापकीय संचालक (C.E.O.)